अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्या दुथडीभरून वाहू लागलेल्या आहेत. या जोरदार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील पारनेर येथे घडलेला आहे. पारनेर मधील वाघुंडे बुद्रुक येथे गावाजवळच हंगा नदीवर असलेला दिवटे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे.
त्यामुळे या मळ्यात राहाणाऱ्या सुमारे शंभरहून अधिक लोकांची गावात येण्यायाची वाटच थांबली आहे. गावात जाण्यासाठी हा मार्ग होता,
मात्र आता हा मार्गच हरवला असल्याने दैनंदिन वस्तूंची देवाण-घेवाण करण्यासाठी नागरिकांपुढे कोणताही दुसरा मार्ग सध्या उपल्बध नाही आहे.
यामुळे वस्तीवरील त्या १०० हुन अधिक कुटुंबांची मोठी कुचंबणा झाली आहे. दरम्यान हंगा नदीला गेली अनेक वर्षात आला नव्हता एवढा मोठा पूर आला होता.
या पुराने मुंगशी येथील एकाचा जीवही घेताल होता. याच काळात वांघुडे बुद्रुक गावातून दिवटे मळ्यात जाणारा सुमारे चार वर्षा पुर्वी बांधण्यात आलेला हंगा नदीवरील पुलही वाहून गेला आहे.
तसेच या नदीतून विद्यूत मंडळाने विज वाहून नेण्यासाठी खांब ऊभा केले आहेत. त्यातील एक खांबही पुराच्या पाण्याने पडला होता.
त्यामुळे हे धोकादायक वीजवाहक खांबही नदीपात्रातून हलविण्याची गरज आहे. अन्य़था यातून मोठी दुर्घटणा घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved