संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ दिवशी पासून होणार सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार असून, 1 फेब्रुवारीला बजेट सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागांत चालणार आहे.

संसदेच्या आधिवेशनाच्या पहिला भाग 29 जानेवारीपासून सुरू होऊन 15 फेब्रवारी पर्यंत चालेल व दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत असेल.

तर, केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रवारी रोजी सादर केला जाईल. 29 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. या अधिवेशन काळात कोरोनाशी निगडीत सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या साथीमुळे केंद्र सरकारने यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन घेतले नव्हते. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

देशातील कोरोना संकटाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, ते पूर्ण संपुष्टात आलेले नाही. ती बाब विचारात घेऊन अधिवेशन काळात आवश्‍यक ते निर्बंध आणि नियमांचे पालन केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान 24 सप्टेंबरला पावसाळी अधिवेशन गुंडाळण्यात आले होते.

यावेळी कृषी कायद्यावरुन झालेल्या गोंधळामुळे आठ खासदारांना अधिवेशनासाठी निलंबीत करण्यात आले होते. कृषी कायद्यावरुन काँग्रेसह विरोधी पक्षांची आंदोलन पुकारले होते. विशेष म्हणजे, कमी दिवसात विक्रमी काम या अधिवेशनात पार पडले होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24