Maharashtra ST News : बसचा चालक पडला आजारी ! वाहकाने चालवली बस, व्हिडीओ झाला व्हायरल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra ST News : पुण्याहून सायंकाळी सहा वाजता सुटलेल्या श्रीरामपूरच्या एसटी चालकाला नगर सोडल्यानंतर त्रास जाणवू लागला. चालकाने वाहक व चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या सहकाऱ्याकडे स्टेअरिंग सोपवत प्रवाशांना सुखरूप श्रीरामपूरला आणले.

श्रीरामपूर आगाराच्या बसमध्ये हा प्रकार घडला. शिवाजीनगर स्थानकातून श्रीरामपूरला सुटणारी ही शेवटची बस होती. ती रात्री अकरा वाजेनंतर येथे दाखल झाली. या गाडीला प्रवाशांची संख्या मोठी असते. रात्रीची वेळ असल्यामुळे अनेक प्रवाशी गाडीत झोप घेतात.

बसने तारकपूर स्थानक सोडल्यानंतर चालकाला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याने वाहकाकडे स्टेअरिंग दिले. त्यामुळे वाहकाने तेथून पुढचा प्रवास हाती घेतला. या दरम्यान प्रवाशांमधून एका व्यक्तीने व्हिडीओ चित्रण केले. रविवारी ते सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मात्र, यात गैर काहीही नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.चालकाला अचानक दुखू लागल्यामुळे त्याने सहकाऱ्याकडे ताबा दिला. त्यामुळे प्रवासी सुखरूपपणे श्रीरामपूरला पोहोचले.

आजारपणात चालकाने बस चालवली असती, तर अनुचित प्रकार घडू शकला असता. मात्र, असे असले तरीही दोघाही कर्मचाऱ्यांचे जबाब सोमवारी नोंदवले जातील, वरिष्ठांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. सर्व परिस्थिती तपासल्यानंतर कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कासार यांनी स्पष्ट केले.