Maharashtra News : कांदा निर्यात बंद केल्याने कांद्याचे भाव कोसळले. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला.
अतिवृष्टमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादकांना निर्यात बंदीमुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
शेतकऱ्यांच्या काद्यांला निर्यात करण्यासाठी परवानगी हवी. केंद्र सरकारने याबाबात लक्ष घालून तात्काळ निर्यात खुली करावी अशी मागणी केंद्रीय पथकाला शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील कांद्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र दौरावर आहे.
यात ग्राहक कल्याण मंत्रालयायाचे संचालक आयइएस सुभाषचंद्र मीना, कृषी मंत्रालयाचे उपसंचालक पंकज कुमार आणि अवर सचिव मनोज के यांचा समावेश आहे.
६ तारखेला बीड जिल्ह्यातील कांदा पाहणी करून ते नगर येथे मुक्कामी आले होते. शेतकरी नेते प्रसाद खामकर यांना याची माहिती मिळाली. त्यांनी पारनेर,
श्रोगोंदा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत या पथकाची शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. त्यांना कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत निवेदन दिले.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने मागील काही दिवसापासून राज्यातील कांद्याचे बाजारभाव घसरले आहे. सर्वात जास्त कांद्या उत्पादक महाराष्ट्रात आहेत.
शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत आहे. केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालून तात्काळ निर्यात खुली करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.