समस्या रोखण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : कोरोना संकटात गोरगरीब व सर्वसामान्यांना मदतीतून दिलासा देण्याऐवजी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ केली.

अनेकांचे रोजगार गेले, महागाई वाढली, सीमेवर अस्थिरता निर्माण झाली, केंद्र सरकारचे हे अपयश असल्याची टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी केली आहे.

काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून गुरुवारी तहसीलदार यांना निवेदन दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून राज्यभर केंद्र सरकार विरुध्द पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आले.

संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात तहसीलदार अमोल निकम यांना फिजिकल डिस्टन्सचे पालन करत निवेदन देण्यात आले. नगराध्यक्ष दुर्गा तांबे, तालुकाध्यक्ष प्रतापराव ओहोळ, शहराध्यक्ष मुर्तडक,

नवनाथ आंधळे, अर्चना बालोडे, संतोष हासे, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, निर्मला गुंजाळ, कचरू पवार, सुरेश झावरे, गणेश मादास, गौरव डोंगरे, शिवाजी जगताप, सौदामिनी कान्होरे, तात्याराम कुटे, बंटी यादव, प्रभाकर शेलार यावेळी उपस्थित होते.

मोदी सरकारने दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवले. मात्र, सध्या कोट्यवधी तरुण बेरोजगार झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ५० रुपये प्रति बॅरल असताना मागील आठवड्यात केंद्र सरकारने सलग भाववाढ केली आहे.

यामुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. आता आश्वासने नको, थेट कृती हवी. भाववाढ तातडीने रोखण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तांबे म्हणाल्या, देशात कोरोनाचे संकट आहे. मात्र, केंद्र सरकार गांभीर्याने घेत नाही. खासदार राहुल गांधी यांनी सुचवलेले न्याय योजनेअंतर्गत गोरगरिबांना थेट मदत मिळावी. वाढते पेट्रोलचे भाव कमी करावेत.

फिजिकल डिस्टंन्सची कडक अंमलबजावणी करत उद्योगांना प्रोत्साहन द्यावे. सिमेवरील निर्माण झालेली तणावसदृश परिस्थितीबाबत देशाला सत्य माहिती द्यावी.

देशातील नागरिक कोरोनाने भयभीत आहेत. त्यात महागाई, चीनची कुरघोडी यामुळे नागरिक चिंताग्रस्त आहे. या समस्या रोखण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तातडीने उपाययोजना कराव्यात, आश्वासन नको कृती हवी, असे तांबे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24