अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यच्या उत्तरेकडील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी आई तालुके साधन आणि पाणीदार तालुके म्हणून ओळखलेजातत. येथील जमीनही बागायत आहे.
परंतु राहाता तालुक्यचा विचार केला तर राहाता तालुक्यात 13 जिरायती गावे आहेत. मात्र यांचे स्वंतत्र महसूल मंडल नसल्याने बागायत गावांच्या पंक्तीतही जिरायत गावे भरडली जात आहेत.
त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील जिरायत भागाचे स्वतंत्र महसूल मंडळ तयार करावे अशी मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही या मेलची दखल घेत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
स्वतः मुख्यंमंत्र्यांनीच लक्ष घातल्यामुळे तालुक्यातील जिरायत भागाचे स्वंतत्र महसूल मंडल होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
राहाता तालुक्यातील या 13 गावांतील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे परतावे, टंचाई अनुदान, कृषी विभागाच्या कोरडवाहू भागासाठी असलेल्या विविध योजना मिळण्यात या गावांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असल्याने
राहाता तालुका काँग्रेस आय कमेटीने डॉ. एकनाथ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, सचिव श्रीकांत मापारी, युवक तालुका अध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांनी सरकारकडे या महसूल मंडळाच्या फेररचनेसाठी मागणी केली होती.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved