कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री दक्षता घेत आहेत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, ते त्यांनी सांगण्याची गरज नाही, असा टोला खासदार सदाशिव लोखंडे यांनी भाजपचे नेेते चंद्रकांत पाटील यांना शनिवारी लगावला.

खासदार लोखंडे यांचे संपर्क कार्यालय व खासदार सुविधा केंद्राचे उद्घाटन संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उत्तर प्रमुख रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे,

उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, आनंद लहामगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, स्मिता अष्टेकर, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, संदेश कार्ले उपस्थित होते.

खासदार लोखंडे म्हणाले, शिर्डीचे साई मंदिर सुरू व्हावी, ही भूमिका माझीदेखील आहे. तथापि, कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री दक्षता घेत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24