मंदिरे उघडण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. कोरोनारुग्णांचा रिकव्हरी रेट जरी चांगला असेल तरी वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे.

अशा परिस्थितीमध्ये अनलॉकच्या चौथ्या टप्प्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली. या दरम्यान, मंदिरे, धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत आग्रही मागणी केली जाऊ लागली.

यावर बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अशी मागणी अनेकांनी केली आहे मात्र त्याबाबत सावधानता बाळगावीच लागेल असंही त्यांनी सांगितलं.

त्यामुळे राज्य सरकार दबावामध्ये कुठलाही निर्णय घेणार नाही असे संकेतच त्यांनी दिल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे.

कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असंही मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केलं.

गुरुवारी सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारेया त्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल, पण कायमस्वरूपी चेहऱ्याला मास्क लावा.

शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री अतिशय महत्वाची आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सुविधा उभारण्यात मदत केली जाईल.

निधीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र या सुविधा वापरायची वेळ येणार नाही इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24