शहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  शहराच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नगरसेवकाने आपआपल्या प्रभागामध्ये नागरिकांना विश्वासात घेऊन विकास कामे केल्यास शहराच्या विकासात भर पडेल.

सभागृहनेते स्वप्निल शिंदे यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात कामे केले आहेत. पुणे, औरंगाबाद व नाशिक या शहरांच्या मध्यवर्ती नगर शहर वसलेले आहे.

या शहराच्या विकासाला गती देण्यासाठी शासनाकडून मोठ्याप्रमाणात निधीची उपलब्धता करण्यासाठी पाठपुराव्याची आवश्यकता आहे.

यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे प्रस्ताव तयार करून पाठविले गेले पाहिजे. शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याशिवाय शहराच्या विकासाला गती येणार नाही.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. यासाठी शासनाच्या निधीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे यांनी केले.

प्रभाग क्रमांक ४ मधील नरहरीनगर येथील बंदपाईप गटार कामाचा प्रारंभ करताना भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी सभागृहनेते स्वप्निल शिंदे, अमित गटणे, प्रकाश आपटे, रमेश ख्रिस्ती, अश्‍विनी जठार, प्रसाद साळी, महेश कुऱ्हे, चिंतामनी, शहा, जवाहर, परदेशी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना स्वप्निल शिंदे म्हणाले की, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहने चालविताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पाऊस उघडल्यानंतर शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामे मंजूर आहे. ती आता सुरू होतील. प्रभाग ४ मध्ये मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या माध्यमातून निधी टाकला आहे.

यामध्ये बंदपाईप गटार, लाईट, रस्त्याची कामे, ओपन स्पेसचे सुशोभिकरण, वृक्षारोपण आदी कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याचे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24