राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुढील काही दिवसांत राज्यात कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. शनिवारी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद साताऱ्यात ११.६ अंश सेल्सिअस करण्यात आली.

मागील तीन ते चार दिवस पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा मध्य भारतात संगम झाल्याने विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले होते.

त्यामुळे विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी विदर्भातील नागपूर, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यांत हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. 

अहमदनगर लाईव्ह 24