अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- केंद्रसरकारने काही दिसांपूर्वी मंजूर केलेले कृषी विधेयकावरून देशातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. हे विधेयक लागू करण्यात येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने देखील केली.
आता याच अनुषंगाने संगमेनर तालुक्यामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी केलेले कायदे तातडीने रद्द करावेत,
या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे काँग्रेस पक्षातर्फे स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेस काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दसर्याच्या दिवशी प्रारंभ करण्यात आला.
शेतकरी व कामगार विरोधी केलेले काळे कायदे केंद्र सरकारने तातडीने रद्द करावेत, या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे दोन कोटी स्वाक्षरी माहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत संगमनेर तालुक्यात एक लाख स्वाक्षरी मोहीम सुरू आहे.
तळेगाव दिघे येथेही शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दसर्याच्या दिवशी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserveup