अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.
राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. लोकार्पणाच्या पहिल्याच चार तासात या संकेतस्थळावर सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली.
ही संकल्पना नगरमधील विनायकराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय वाखुरे व त्यांचे मित्र अजय रासकर यांची आहे. यांनी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे ही संकल्पना मांडली.
कोरोनामुळे राज्यातून जवळपास 22 लाख कामगारांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगारांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे उद्योगांना कामगार मिळावेत, राज्यातील मराठी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, यादृष्टीने राज्य सरकारने ऑनलाइन पोर्टल सुरू करावे, जेणे करून राज्यातील उद्योगांना कामगार मिळतील व बेरोजगारांना नोकरी मिळेल,
अशी मागणी विनय वाखुरे पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली होती. ही मागणी तनपुरे यांनी शासनस्तरावर पोचवली.आणि हे पोर्टल अस्तित्वात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews