मुख्यमंत्र्यांसाठी कोंग्रेसने सोडली विधानपरिषदेची जागा,परंतु त्या बदल्यात घेतले ‘येवढे’ सारे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : विधानपरिषदेसाठी  दोन जागा लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या काँग्रेसमुळे शिवसेनेची गोची झाली असती. परंतु आता काँग्रेसने शेवटच्या एक जागा लढवण्याच मान्य केलं.

परंतु या एका जागा गमावल्याच्या बदल्यात मात्र काँग्रेसने बरचं काही कमावलं.

महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरलाय असं काही-

– सत्तावाटपात काँग्रेसचा यापुढे सन्मान राखला जाईल

– यापुढे सत्ता वाटप करताना संख्याबळाचा विचार केला जाणार नाही

– सत्तेतील सर्व पदांचं वाटप तीनही पक्षात समान होणार

– महामंडळाचे वाटप, यापुढील सर्व विधानपरिषदेच्या जागांचं समान वाटप होणार

– शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद असल्याने सध्या शासनाच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा आहे,

यापुढे मात्र निर्णय प्रक्रियेत काँग्रेसलाही सामावून घेतले जाणार. त्यांचा सन्मान केला जाणार, असं आजच्या बैठकीत ठरलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24