प्रवासादरम्यान जोडप्याची बॅग गेली चोरीस; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-  जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी हि पोलिसांबरोबरच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. तसेच जिल्ह्यांतर्गत लुटीचे प्रकार देखील चांगलेच वाढीस लागलेले दिसून येत आहे.

जिल्ह्यात दररोज कोठेतरी लुट झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान नुकतीच प्रवासादरम्यान पती-पत्नीची बॅग चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या बॅगमध्ये सोन्याचे दागिणे, रोख रक्कम, एटीएम कार्ड व काही महत्वाची कागदपत्रे होती.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास मधुकर जगताप (रा. प्रतिकनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती आहि कि, फिर्यादी व त्यांच्या पत्नी एका खाजगी बसमधून पुणे येथे चालले होते. त्याच्यासोबत एक बॅग होती.

या बॅगमध्ये 1 लाख 35 हजार रूपयाचे मंगळसूत्र, 8 हजार 700 रूपये रोख, एटीएम कार्ड व महत्वाची कागदपत्रे होती. प्रवास करीत असताना बस नगर शहरातील कोठला येथे थांबली होती.

त्याठिकाणीच फिर्यादी यांची बॅग चोरीला गेली. बॅगमध्ये असलेल्या एटीएम कार्डचा वापर करून चोरट्याने नगर शहरातून 21 हजार 500 रूपये काढून घेतले असा एकुण 1 लाख 65 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला.

बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायवट करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24