अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने ठोठावली हि शिक्षा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.

यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पीडित मुलीच्या नात्यातील आरोपीला न्यायालयाने आज शिक्षा सुनावली आहे.

या बाबत माहिती अशी, सदर प्रकरणातील आरोपी याने आजोबाच्या घरी असणा-या अल्पवयीन मुलीस खोटा बनाव करत आपल्या सोबत दुचाकीवरून घेऊन गेला.

रस्त्यातच शेत पाहून त्याने गाडी थांबवून पीडितेवर अत्याचार केला. त्यांनतर त्या पीडित मुलीस बस स्टॅन्ड वर सोडून दिले. घडलेली घटना कोणालाही न सांगण्याची धमकी देत आरोपीने पळ काढला.

घरी गेल्यांनतर पिडीतेने घडलेला प्रकार आजी-आजोबांना सांगितला. त्यावर आजोबांनी घटनेबाबत पीडीतेचा भाऊ व विधवा आईस सांगितले. या बाबत पिडीतेच्या भावाने नेवासे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यावरून आरोपी विरूध्द बलात्कारसह आदी गुन्हयाची नोंद करण्यात आली. सदर खटल्यात साक्षीपुरावे व सरकारपक्षातर्फे केलेला युक्तीवाद ग्राहय धरून नेवासे येथील जिल्हा व विशेष न्यायाधीश एस. एम. तापकिरे यांनी शिक्षा सुनावली.

अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणा-या नाराधमास नेवासे जिल्हा न्यायालयाने दहा वर्षांची सक्तमजूरी व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24