मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील संकट टळले ;होणार बिनविरोध आमदार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले परंतु त्यांना दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचा सदस्य होणे गरजेचे होते. त्यानुसार विधानपरिषदेसाठी तशी तयारी सुरु झाली.

परंतु काँग्रेसमुळे अडचण उभी राहिली होती परंतु आता काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेतल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. उद्धव ठाकरे यांचा आमदार व्हायचा मार्ग सुकर झाला आहे.

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी भाजपने चौघांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी २-२ उमेदवार दिले होते आणि शिवसेना २ उमेदवार रिंगणात उतरवणार होती.

त्यामुळे या १० जणांना ९ जागांसाठी निवडणूक लढवावी लागली असती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीसाठी उभे राहत असल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आग्रही होती.

पण काँग्रेस मात्र २ जागांवर ठाम होती. काँग्रेस जर दुसरा उमेदवार देत नसेल, तर आपणच निवडणुकीला उभे राहत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं.

शिवसेनेकडून ही बातमी लिक झाल्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी होती. अखेर महाविकासआघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत तोडगा काढण्यात आला,

त्यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार बनवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.

अहमदनगर लाईव्ह 24