अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- मिशन बिगिन अंतर्गत राज्यात नवीन नियमवाली जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील ग्रंथालये, वाचनालये सुरु करण्यात आले आहे.
यातच शहरातील वाचनालय देखील सुरु करण्यात आले आहे. दरम्यान सरकारी आदेशानुसार अहमदनगर जिल्हा वाचनालय सकाळी 9.30 ते 5 या वेळेत वाचकांसाठी खुले राहील,
अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक व प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी दिली. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रंथालये, वाचनालये बंद ठेवण्यात आली होती.
तसेच अनेकदा वाचनालये सुरु करण्यात यावी अशी मागणी देखील जोर धरू लागली होती. यातच राज्याच्या मुख्यमंत्र्यानी लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर केली व अनेक महिन्यांपासून बंद असलेली ग्रंथालये व वाचनालयाची दारे उघडली.
मात्र ग्रंथालय संचालनालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ग्रंथालयांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा वाचनालयाची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 अशी करण्यात आली आहे.
रविवारी वाचनालय बंद राहील. पुढील शासकीय आदेश येईपर्यंत ही वेळ राहील अशी माहिती उपाध्यक्षा शिल्पा रसाळ व अजित रेखी यांनी दिली.
शासनाच्या नियमांचे पालन करूनच वाचनालय पुन्हा सुरु करण्यात आले आहे, तरी वाचकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved