महाराष्ट्र

मुंबईतील घराचे स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाच्या 2030 घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू, असा भरा अर्ज !

Published by
Ahmednagarlive24 Office

सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसाठी असणारी म्हाडाच्या मुंबईतील २०३० घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अवघ्या काही तासांत संपणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी १२ वाजता गो लाईव्ह उपक्रमांतर्गत नोंदणी व अर्ज स्वीकृतीला सुरुवात होणार आहे.

या सोडतीत पहाडी गोरेगाव, अ‍ॅण्टॉप हिल वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड या गृहनिर्माण प्रकल्पांतील विविध उत्पन्न गटातील सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.

या सोडतीचा अर्ज भरताना म्हाडाने काही प्रमाणपत्रे बंधनकारक केली आहेत. जर प्रमाणपत्र म्हाडाला अर्ज भरतानाच उपलब्ध करून दिली तर सोडत झाल्यानंतरच अवघ्या काही दिवसात घरांचा ताबा मिळणार आहे.

अर्ज करताय ! हे माहिती असणे गरजेचे

म्हाडाच्या सोडतीचे माहितीपुस्तक शुक्रवारी दुपारपासून उपलब्ध असणार आहे.

म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला (housing.mhada.gov.in) भेट द्या.

अर्जदाराचे नाव, पासवर्ड तयार करून स्वतः ची नोंदणी करा.

तुमच्या उत्पन्न गटानुसार सोडत आणि योजना निवडा.

सोडतीसाठी उत्पन्न गटानुसार नोंदणी शुल्क ऑनलाइन भरा.

नावनोंदणीसाठी म्हाडाच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनला भेट द्या.

ही कागदपत्रे तयार ठेवा !

पॅनकार्ड, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, रद्द चेक, करभरणा पावती, चालक परवाना, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, जन्म प्रमाणपत्र, अर्जदारांचे संपर्क तपशील

अशी असणार आहे वर्गवारी !

अत्यल्प उत्पन्न गट: ६ लाख रुपयांपर्यंत
अल्प उत्पन्न गट: ९ लाख रुपयांपर्यंत
मध्यम उत्पन्न गट : १२ लाख रुपयांपर्यंत
उच्च उत्पन्न गट : १२ लाख रुपयांहून अधिक

Ahmednagarlive24 Office