जनतेने पाहिलेेले विकासाचे स्वप्न साकार करणार – आमदार आशुतोष काळे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कोपरगावच्या जनतेने निवडून देताना विकासाचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न पूर्ण करण्याची जबबादारी खांद्यावर घेत मतदारसंघातील रेंगाळलेले पाणी, रस्ते विजेचे प्रश्न मार्गी लावत आहे.

यापुढेही विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन जनतेने पाहिलेेले विकासाचे स्वप्न साकार करणार आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०१९/२० नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत गोदावरी उजवा तट कालवा सुरेगाव येथील अंदाजे ८०.३४ लक्ष रकमेच्या पुलाचे कामाचे भूमिपूजन आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

मागील दोन महिन्यांपासून कोपरगाव तालुका कोरोनामुक्त होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी महिला डॉक्टर कोरोना बाधित आढळून आली असून नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन आमदार काळे यांनी केले.

प्रशासनाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन केल्यामुळे इतर तालुक्याच्या तुलनेत कोपरगाव तालुक्याची परिस्थिती कोरोनाचे बाबतीत नियंत्रणात ठेवल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24