मुंबई 18 मे 2020 : लॉकडाऊनमध्ये अडकले नागरिक सध्या मिळेल त्या साधनाने आणि असेल त्या परिस्थितीमध्ये गावाकडे चालले आहेत. परंतु त्यांच्या अशा बेकायदेशीर प्रवासामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे.
अनेक नागरिक प्रशासनाला सहकार्य करताना दिसत नाही. परंतु नवादामधील कोशी गावात राहणाऱ्या चालकांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
हे 10 चालक मुंबईतील रेड झोनमधून आल्यानंतर आपल्या गावातील एका शाळेत सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी गावकऱ्यांना आणि घरातल्यांना संदेश पाठवला आहे.
ते सर्व यांना भेटण्यासाठी आले होते मात्र या चालकांनी कोणालाही आपल्या जवळ येऊ दिलं नाही. त्यापैकी एक चालक म्हणतो, मुंबईत त्यांनी कोरोनाचा कहर पाहिला आहे.
त्यामुळे सर्वांनी निर्णय घेतला की ते घरी नक्की जातील मात्र 21 दिवसांपर्यंत आपल्या घरातील सदस्यांना भेटणार नाही. या सर्व चालकांनी प्रवासादरम्यान कोठेही काहीही अन्न आणि चहा घेतला नाही. ते स्वत: तयार करून जेवत होते. असाच त्यांनी मुंबई ते नवादापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आणि आपल्या गावी पोहोचले.