अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा :- मागील भांडणाच्या कारणावरून पिंपळगावपिसा कारखाना शिवारात राहणारे हस्तीमल चाफ्या काळे (वय ७० वर्षे) यांचा सहा ते सात आरोपींनी चाकूने भोसकून खून केला.
ही घटना काल (दि. ४) सकाळी अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयताचा मुलगा किशोर काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रमेश काळे, अलोशा काळे, गिल्या काळे, सतेशा भोसले, छत्तीस भोसले, हुल्या भोसले, कलकाबाई काळे रा. मोहोरवाडी, ता. श्रीगोंदे, या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, मयत हस्तीमल काळे हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत पिंपळगाव पिसा येथील कुकडी कारखाना शिवारात राहतात.
सकाळी अकराच्या सुमारास आरोपी रमेश काळे, अनुशा काळे, गिल्या काळे, सतेशा भोसले, छत्तीस भोसले, हुल्या भोसले, कलकाबाई काळे रा. मोहोरवाडी, ता. श्रीगोंदे, हे हस्तीमल काळे यांच्या घरी आले व तू आमच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घे, असे म्हणत हस्तीमल काळे यांचा चाकूने भोसकून खून केला.
घटना घडल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती समजताच पो. नि. दौलतराव जाधव, पो. उपनिरीक्षक बोराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.