आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम ; देवेंद्र फडणवीसांचा अर्णब गोस्वामी अटकेनंतर हल्लाबोल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले. गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, अर्णब यांच्या अटकेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरण, पालघर येथील साधू हत्या, कंगना रानौत आणि राज्य सरकारमधील वाद आदी मुद्यांवर राज्य सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या

अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलिसांनी अटक केली. वास्तूविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचे नाव असल्याचा दावा त्यांच्या कुटूंबियांनी केला होता.

दरम्यान, भाजपनेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले फडणवीस :- “आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत.

सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे, अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24