अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना टार्गेट करणे चुकीचे असून, समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले.
मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली,’ असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला.
राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गायकवाड बोलत होते. ‘मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्याची शक्यता वाटत नाही.
त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाचे (ईडब्लूएस) लाभ देण्यात यावेत,’ अशी गायकवाड यांची मागणी आहे.
‘मराठा समाजाच्या ‘एसईबीसी’ आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने, ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाज पात्र आहे.
मात्र, राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केले नसल्याने तहसीलदार, प्रांत अधिकारी मराठा समाजातील युवक-युवतींना ‘ईडब्लूएस’ प्रमाणपत्र देत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved