पिंपरी : येथील बावधन येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्यानेच आपल्या पाच महिन्यांच्या चिमुरडीची हत्या केली आहे.
पत्नीशी भांडण झाल्याच्या रागातून त्याने चिमुरडीचे तोंड व नाक दाबले.
त्यामुळे गुदमरून मुलीचा मृत्यू झाला.शनिवारी पहाटे ही घटना घडली.
बापुराव नामदेव जाधव (वय ३५, रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी) असे या आरोपीचे नाव असून
हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापुराव आणि फिर्यादी जोताबाई यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
त्यांचे घरगुती कारणावरून सतत भांडणे होत असत.
शुक्रवारी (दि. ८) देखील त्यांचे भांडण झाले होते.
त्या भांडणाच्या रागातून आरोपी याने त्यांची पाच महिन्याची मुलगी झोपली असताना तिचे नाक व तोंड हाताने दाबून ठेवले.
त्यामुळे गुदमरून मुलीचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.