त्या चौघांनी दुचाकीस्वाराला थांबवले व शेतात ओढत नेले… पहा पुढे काय घडले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- महामार्गावर वाहनधारकांना अडवून लुटणाऱ्या टोळीला गेल्या दोन दिवसांपूर्वीच पोलीस पथकाने जेरबंद केले होते. मात्र तरीही अशा घटना सुरूच आहे.

नुकतीच शहरापासून काही अंतरावर अशी घटनांची पुनरावृत्ती झाली आहे. मोटारसायकलवर मुंबईकडे जाणाऱ्या तरुणास नगर पुणे महामार्गावर चास परिसरात चार चोरट्यांनी अडवून लुटले आहे.

यात जवळपास १ लाख १० हजाराचा मुद्देमाल लुटला आहे. याबाबत हेमंत भालचंद्र तिकोणे (वय २९,. रा. पारनेर) याने पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तिकोणे यांच्या फिर्यादीनुसार ५ ऑक्टोबरला पल्सर बाईक वरती भिंगार येथून नगर पुणे रोडने मुंबईकडे जात होतो.

सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चास शिवारात एका अनोळखी व्यक्तीने हात केला तेव्हा तिकोणे याने मोटारसायकल थांबविली.

त्याचवेळी आणखी तिघे जण मोटारसायकलवर आले त्यांनी तिकोणे यांची कॉलर धरून शेतात ओढत नेले. त्यांनी मारहाण करून खिशातील रोख रक्कम, मोबाईल,

मोटारसायकल असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लुटून पसार झाले. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24