वाहन चालकांना लुटणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- रात्री – अपरात्री प्रवास करणाऱ्या वाहनांना अडवून त्यांना लुटण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात घडले आहे. दरम्यान या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे.

भारत रामकिसन मरकड, (वय-४५ वर्षे, धंदा- घेती, रा.मढी, ता- पाथर्डी) हे त्यांच्या दुचाकीवरुन बोधेगांव येथून शेवगांव-तिसगाव रोडने मढी येथे येत असताना ढवळेवाडी फाटा शिवारात मोटार सायकल वरुन तोंडाला मास्क बांधुन आलेल्या चार अनोळखी इसमांनी मरकड यांना मारहान करुन त्यांच्याजवळील ऐवज व

त्यांची ४५,०००/- रु. किमतीची सी.बी.शाईन कंपनीची मोटार सायकल बळजबरीने चोरुन नेली होती. सदर घटने बाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. एलसीबीचे पोनि. दिलीप पवार यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. सदरचा गुन्हा हा विशाल एडके (रा. पाथर्डी)

याने व त्याचे साथीदारांनी मिळुन केला असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी पाथर्डी येथे जावुन आरोपीचे वास्तव्याबाबत गोपणीय माहिती काढुन सापळा लावुन आरोपी विशाल शिवाजी एडके ( वय २०वर्ष रा. शेवगाव रोड, पाथर्डी) यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता,

त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार रंजित कंटाळे, परशुमराम मोरे व ऋषिकेश कंठाळे अश्यांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेवुन रंजित शिवाजी कंठाळे( वय २० वर्ष, रा.सुसरे ता.पाथर्डी), परशुराम आप्पा मोरे (वय २० वर्ष रा.रेणुकानगर,शेवगाव),ऋषिकेश आबासाहेब कंठाळे ( वय २१ वर्ष रा. सुसरे ता. पाथर्डी )

यांना वेगवेगळ्या ठिकाणाहुन ताब्यात घेतले. मागील दोन महिण्याचे कालावधी मध्ये माणिकदौंडी घाट, चितळी पाडळी शिवार व आंतरवाली फाटा या परिसरामध्ये दुचाकी स्वारांना आडवुन लुटमार केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून १लाख ४२हजार ५००/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24