मुंबई :- रेल्वेवरील लोकलगर्दीनं आणखी एका तरुणीचा बळी घेतला आहे. गर्दीच्या रेट्यामुळं धावत्या ट्रेनमधून पडून तरूणीचा मृत्यू झाला. डोंबिवली-कोपरदरम्यान आज सकाळी ही घटना घडली.
डोंबिवली-कोपर स्थानका दरम्यान सकाळी ९.२० वाजता जलद लोकलमधून ही तरुणी पडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चार्मी शांतिलाल पासड (२२ वर्ष) असं मृत तरुणीचे नाव आहे.
आज सकाळीच ती कामा वार जाण्यासाठी घराबाहेर पडली, डोंबिवली स्थानकात सकाळच्या वेळेस प्रचंड गर्दी होती. ऑफिसला पोहोचायला उशीर होऊ नये आणि लेटमार्क लागू नये म्हणून तिनं गर्दीतही ट्रेन पकडली.
गर्दीमुळं तिला कशीबशी दरवाजाजवळ उभं राहायला जागा मिळाली. तिनं आत शिरण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला.
ट्रेन कोपरजवळ पोहोचली असता, गर्दीच्या रेट्यामुळं तिचा हात सुटला आणि ती ट्रेनमधून खाली पडली. यात ती गंभीर जखमी झाली.
मृत तरुणी डोंबिवलीतील देसलेपाडा येथे राहयची. चार्मी ही नवोदित मॉडेल आणि अभिनेत्री होती. एका खासगी कंपनीत ती नोकरी करत होती.