अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करण्याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा मी घेणार नाही, तर तो पक्षातील वरिष्ठ नेतेच घेतील, असे स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी देतानाच कोरोना उपाययोजना करण्याबाबत राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला.
नगरमध्ये शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, आमदार मोनिका राजळे, पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, नगर तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, सचिन पारखी यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोरोनाबाबत केंद्र सरकार महाराष्ट्राला दिलासा देत असताना केंद्र सरकारबद्दल अपप्रचार करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. कोरोनाबाबत सरकार विरोधी पक्षालाही विश्वासात घेत नाही. प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते.
कोरोना संदर्भामध्ये ज्या पद्धतीने सरकारने उपाययोजना करायला पाहिजे होत्या, त्या पद्धतीने केल्या नाहीत. त्यांनी विरोधकांनाही बरोबर घ्यायला पाहिजे होते. पण त्यांनी कुणालाही बरोबर घेतले नाही. उलट हेच केंद्र सरकारच्या मदतीची वाट पाहत आहेत.
दरम्यान, भाजप सरकार पाडत आहे, असे विषय पुढे करून लोकांचे कोरोनावरून लक्ष हटवण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, असेही ते म्हणाले.राज्यामध्ये निसर्ग वादळामुळे मोठे नुकसान झालेले आहे. त्यानुसर आम्ही केंद्र सरकारकडे जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews