सरकारने त्वरीत वीज बिले माफ करावीत, अन्यथा रस्त्यावर उतरू – राजू शेट्टी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- नुकतेच ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी घरगुती वीज बिले वसूल केले जाईल, असे वक्तव्य केले होते.

त्याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, वीज बिले वसूल करणार, ही काय गोड बातमी आहे काय? नितिन राऊत यांना जर कोणतेही अधिकार नसतील तर पोकळ घोषणा करू नयेत,

या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारून मगच घोषणा करावी. लॉकडाऊनमध्ये सगळं काही बंद होते. कुणाच्या हाताला कामे नव्हती. गोरगरीबांकडे पैसा नाही.

ही वीज बिले भरायची कशी? सर्वसामान्य माणसाला सरकारने घरात कोंडून ठेवले होते. लोकांच्याकडे पैसे नाहीत म्हणून लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत अशी आमची माफक मागणी आहे.

मात्र वीज वितरण कंपनीने वसुली करण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकारने काहीसे पॅकेज दिले. मात्र राज्य सरकारने जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही.

ऊर्जामंत्र्यांनी यापुढे कोणतीही घोषणा करताना वरिष्ठांची परवानगी घ्यावी, मगच जनतेला आश्वासने द्यावीत, सरकारने त्वरीत वीज बिले माफ करावीत, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारशी दोन होत करू, असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24