अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर १३ % मराठा आरक्षणाची जागा राखून ठेऊन पोलिस भरती कशी करता येईल.
राज्य सरकारने ही भरती त्वरित थांबवावी, अन्यथा याचे पडसाद तीव्र होतील असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.
मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना गृह मंत्री अनिल देशमुख यांनी १२५०० जागांवर पोलीस भरतीचा निर्णय घेतला. त्यामध्ये तेरा टके आरक्षण राखीव ठेवायचा निर्णय त्यांनी सांगितला.
पण या आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, शिवाय घटने मध्ये असा कोणतेही तरदूत नाही. मग राज्य सरकार असा निर्णय कसा घेत आहे
असा प्रश्न यावेळी विकास पासलकर यांनी केला आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सोडवला पाहिजे आणि अन्य मागण्या मान्य केल्या पाहिजे असं मत संभाजी ब्रिगडेचे केंद्रे निरिक्षक विकास पासलकर यांनी मांडले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved