पालकमंत्री म्हणाले अण्णा हजारेंच्या आंदोलनास राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पाठिंबा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-कृषी कायदे रद्द व्हावेत तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेती मालाला दुप्पट भाव मिळावा यामागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या ३० जानेवारीपासून उपोषण सुरू करणार आहेत.

शेतकऱ्यांच्या हितासाठी जे कोणी चांगलं करत असेल किंवा आंदोलन करत असेल त्यांना आमचा पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीनही कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून आज (सोमवार) मुंबई येथे आझाद मैदान येथे शेतकऱ्यांचा मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जे कोणी आंदोलन करत असेल

त्यांना आमचा पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. केंद्र सरकारने लेखी आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न केल्याने यावेळेस शेवटचं उपोषण करणार असल्याची ठाम भूमिका अण्णा हजारे यांनी घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने अण्णांच्या आंदोलनास पाठिंबा देत भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24