पालकमंत्री म्हणतात शेतकऱ्यांचे तोंड गोड करू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करीत अहोत पंचनामे करुन शेतकऱ्यांचे तोंड गोड कसे करता येईल याची काळजी आम्ही घेवु.

या भागातल्या उसतोडणी कामगारांना तोडणीचा दर सत्तावीस टक्यांनी वाढवुन देण्याचा आग्रह आम्ही शरद पवारांकडे धरला आहे व तो मान्य केला जाईल.

शेतक-यांनी धीर सोडु नये असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मालेवाडी येथील गोरक्ष दराडे यांच्या पाण्यात गेलेल्या कपाशीच्या पाहणी करताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी शेतक-यांशी सवांद साधला.

यावेळी केदारेश्वरचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, महसुल विभागाचे नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,

जिल्हा परीषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,शिवशकंर राजळे, बाळासाहेब ताठे, गहीनीनाथ शिरसाट, बंडु बोरुडे, विष्णुपंत पवार,

प्रांतअधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार शाम वाडकर, तालुकाकृषी अधिकारी प्रविण भोर, बन्सीभाऊ आठरे,वैभव दहीफळे, दिलीप पवळे, अनिल ढाकणे उपस्थीत होते.

आगसखआंड, शेकटे,मालेवाडी, भालगाव येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी मुश्रीफ व अधिकारी आणि पदाधिका-यांनी केली.

मुंगुसवाडे येथील विहरीत बुडुन मृत्युमुखी पावलेल्या मायलेकीच्या घरी पालकमंत्री मुश्रीफ यांनी भेट देवुन नारायण हिंगे यांचे सात्वन केले. सरकारी मदत देण्याचा प्रयत्न करतो असे हिमगे कुटुंबाला सांगितले

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24