अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : पोलिसांनी कोरोनाच्या लढ्यात प्रमुख मोलाची भूमिका बजावली म्हणून त्यांना कोविड योद्धा संबोधले जाते. एकीकडे नागरिकांच्या आरोग्यासाठी पोलीस दिवस रात्र एकत्र करून आपल्या प्राणाची बाजी लावून नागरिकांचे कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर ऊन , वारा , पाऊस याची तमा न बाळगता उभे आहेत. मात्र कोपरगाव येथील या पोलीस कोविड योध्यांच्या कुटुंबाचे आरोग्य हे धोक्यात आले आहे.
पोलीस कर्मचारी हे पोलीस स्टेशन जवळील शासनाने दिलेल्या पोलीस क्वार्टर येथे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. या पोलीस चाळी समोर मोठ्या पटांगणात अधिकाऱ्यांनी कारवाई केलेले डंपर, ट्रॅक्टर, ट्रक तसेच पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी, अपघातात सापडलेल्या दुचाकी अशा दुरावस्त वाहनांनी हा परिसर अस्वच्छ झाला आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या ठिकाणी मोठे तळे साचले आहे. त्यामुळे या ठिकाणी डासांचे साम्राज्य पसरले आहे, तसेच या ठिकाणी लावण्यात आलेल्या दुचाकी गाड्यांच्या मध्ये जनावर मृत्युमुखी पडल्याने मोठी दुर्गंधी सुटली आहे.
पाण्याच्या साचलेल्या डबक्यांमुळे तेथे जवळच असलेल्या शौचालयात जाण्यासाठी धड रस्ता नाही. अशा सर्व बाजूनी या पोलीस चाळीला घाणीच्या साम्राज्यानी घेरले असून या कोव्हीड योध्यांचे व त्यांच्या घरच्यांचे आरोग्य मोठे धोक्यात आले आहे. एकीकडे कोपरगाव नगरपरिषदेला स्वच्छतेचा पुरस्कार दिला जातो.
तर दुसरीकडे नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस चाळीच्या परिसराची स्वच्छता राखली जात नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. या परिसराची स्वच्छता करावी. अशी मागणी येथील रहिवाश्यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews