अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- साता जन्माची साथ देण्याची शपथ घेऊन आयुष्यभरासाठी लग्नाच्या बेडीत अडकलेले पती – पत्नी आजवर आपण पहिले असतील.
मात्र येथे खुद्द पतीनेच केवळ पैशासाठी आपल्या पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नेवासा तालुक्यात घडली आहे.
पत्नीने आपल्या पतीस पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीच्या तोंडात विषारी औषध टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, 6 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उमेश भांगे (पती) याने आपली पत्नी निर्मला उमेश भांगे (वय 35) हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मोटारसायकल सोडविण्यासाठी पैशाची मागणी केली असता फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला.
त्याचा राग येऊन आरोपी याने फिर्यादीचे केस धरून खाली पाडून तिचे अंगावर बसून तांब्यातील पाण्यामध्ये कालवून ठेवलेले विषारी औषध फिर्यादीच्या तोंडात टाकून तिस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान पीडित निर्मला उमेश भांगे यांच्यावर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. निर्मला भांगे यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी उमेश एकनाथ भांगे याचेवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर करत आहेत.
महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने समाजातील महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved