हाथरस येथील घटना देशाला काळीमा फासणारी – मंगल भुजबळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- हाथरस येथील दलित समाजातील मनीषा वाल्मिकी वर उच्च वर्णीयातीलकाही गाव गुंडांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.

सदरील घटनेतील आरोपींचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जीवे मारण्याचे कृत्य केले

या सर्व घटनेचा फुले ब्रिगेड च्या वतीने निषेध व्यक्त करून घटनेतील सर्व आरोपी विरुद्ध सक्षम गुन्हे दाखल करण्यात यावे व उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटना देशाला काळिमा फासणारी आहे.

देशात दिवसेंदिवस वाढत चाललेले स्त्रियांवरील अन्याय अत्याचार हे निंदनीय असून अशा वाढत्या घटनेमुळे देशातील स्त्रिया मात्र सुरक्षित नसताना दिसून येत आहे प्रशासनाने वेळीच अशा घटनेवर कठोर पावले उचलून

घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून परत हाथरस सारख्या अमानवीय घटना व देशात काळीमा फासणारी घटना घडू नये अशी मागणी फुले ब्रिगेडच्या शहर जिल्हा महिला अध्यक्ष मंगल भुजबळ यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24