अशा महान नेत्यांची उणीव कायम राहील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ व ताकद देण्याचे काम स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले. सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ असतो, हे ते जाणून होते.

राज्यात शिवसेना-भाजपच्या युतीचे ते शिल्पकार होते. त्यांनी दोन्ही पक्षातील समन्वयाक म्हणून चांगली भुमिका पार पाडली. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे त्यांच्यावर प्रेम होते.

तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, समाजाचे संघटन करण्यासाठी त्यांनी आपले जीवन अपर्ण केले. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

नगरमधील शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची एक चांगली फळी निर्माण करून नगरमध्ये विविध स्थानिक स्वराज्य संस्थेवर युतीचा झेंडा फडवला होता. अशा महान नेत्यांची उणीव कायम राहील, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

शिवसेनेच्या वतीने स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते,

माजी महापौर अभिषेक कळमकर, उपजिल्हा प्रमुख आनंद लहामगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अशोक दहिफळे, संतोष गेनप्पा, संजय आव्हाड आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24