अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- आरक्षण असो की अन्य काहीही राज्यातील आघाडी सरकारला काही करता येत नाही. दहा महिने झाले. मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत.
यापेक्षा वेगळं काही होणार नाही. अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे . चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही टीका केली. यावेळी ते म्हणाले की, हजारो कोटींचा खर्च करूनही मुंबईतील नालेसफाईचा प्रश्न सुटत नाही.
मी सुद्धा काल मुंबईत अडकलो होतो. ‘मुंबई तुंबई होतेय’ हे खरं आहे, असं सांगतानाच येत्या पालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील असेही ते म्हणाले.
राज्यातील कोरोना बळींची संख्या लपवली जात आहे. मृत्यूची संख्या जाहीर झालेली असताना त्यात एक लाख मृत्यूंचा फरक आहे. देशात राज्याचा वन थर्ड फरक आहे. असा आरोप देखील त्यांनी केला.