समता परिषदेचा आयोजित मोर्चा झाला स्थगित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- मराठा समाजाला आरक्षण देतांना विचार होतांना ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, अशी ग्वाही नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.

या आश्वासनानंतर राज्यभरात ओबीसींचे होणारे मोर्चे स्थगित करावेत, अशी आवाहन मंत्री ना.छगनराव भुजबळ यांनी केले असल्याचे दि.30 रोजीचा मोर्चा स्थगित करण्यात आली असल्याची माहिती समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी दिली.

याबाबत समता परिषदेचे संस्थापक तथा अन्न व पुरवठा मंत्री ना.छगनराव भुजबळ यांची मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर झालेल्या चर्चेनुसार ओबीसी आरक्षणाबाबत भुमिका स्पष्ट झाली आहे.

त्यामुळे राज्यातील पुढील आंदोलने स्थगित करण्यात आले असल्याचे महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी खासदार समीर भुजबळ, माजी आ.पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी जाहीर केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24