अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे यंदाच्या वर्षीचे सर्वच सणउत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाचा दिवाळीचा उत्सव देखील अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन सरकारने केले आहे.यात दिवाळीत भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेल्या “भाऊबीज” या सणानिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी ऑनलाइन भाऊबीज साजरी केली.
भायखळा येथील महापौर निवासस्थानी कोरोना काळात सदैव साथ देणाऱ्या विविध क्षेत्रातील २१ भावांसोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून “भाऊबीज” साजरी करण्यात आली.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेले प्रातिनिधिक स्वरूपातील २१ भाऊ ऑनलाइन उपस्थित असताना महापौरांचे पती किशोर पेडणेकर व मुलगा साईप्रसाद पेडणेकर तसेच वांद्रे येथील बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.राजेश ढेरे हे “भाऊबीज” कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित होते.
महापौर म्हणाल्या कि, भाऊबीज ही पारंपरिक सण सांभाळत साजरी होत होती पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी राखत ऑनलाइन २१ भाऊरायांना ओवळत साजरी करण्याचा निर्णय घेतला व एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करीत भाऊबीज साजरी केली
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved