अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- सध्या दिवाळी सणाची खरेदी सुरू झाली असून त्यानिमित्त शहरातील प्रमुख बाजारपेठेसह इतर दुकानेही गजबजली आहेत. मात्र या गर्दीचा फायदा भुरटे चोर घेत आहेत.
शहरातील माळीवाडा परिसरातील कोहीनूर गार्डन समोर एका व्यापाऱ्याचे पावणेतिन लाख रूपये हिसकावून पळवल्याची घटना घडली आहे.
प्रसन्नकुमार नेनसुखलाल नहार (वय ६५, रा.कोहिनूर गार्डन) असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे.याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, माळीवाडा परिसरातील कोहीनूर गार्डन येथील रहिवासी असलेले नहार यांचे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दुकान आहे.
काल सात वाजण्याच्या सुमारास नहार यांच्या जवळ दुचाकीवर दोन अनोळखी अज्ञात इसम आले व त्यांनी नहार यांना हमे कृष्णा अर्पाटमेंट को जाना है,रस्ता बोलो असे हिंदीतून विचारले.
या दरम्यान नहार यांच्या हातातील २ लाख ७० हजार रूपये असलेली पैशांची बॅग बळजबरीने धुमस्टाईल हिसकावून नेली. यावेही नहार यांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
याबाबत माहिती मिळताच शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील, कोतवाली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भेगाळे,पोसई शिरसाठ आदंीनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved