अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे.
दोन हजार रुपयांच्या हफ्त्याने ही रक्कम दिली जाणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. या योजनेतून मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात.
आपल्या खात्यात जमा होणाऱ्या पैशांची माहिती आपणास व्हावी यासाठी सरकारने ऑनलाईन सेवा प्रदान केली आहे. यातून आपण सर्व माहिती मिळवू शकता.
* ही आहे पीएम किसान योजना-
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पंतप्रधान किसान ही देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारची सर्वात मोठी फायदेशीर योजना आहे. मोदी सरकारने अशा शेतकऱ्यांसाआर्थिक मदत करण्यास सुरवात केली आहे,
जे कधीकधी पैशाअभावी शेती करीत नाहीत. पीएम किसान योजनेंतर्गत लघु व सीमांतिक शेतकर्यांना 3 हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. कोरोना व्हायरसच्या या आर्थिक मंदीमध्ये ही योजना शेतक-यांना मोठ्या प्रमाणात मदत करणारे ठरणार आहे.
* असे चेक करा या योजनेतील आपले नाव आणि सद्यस्थिती
https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर क्लिक करुन मेन्यू मध्ये जावून फार्मर कॉर्नर वर जावे. लाभार्थी सूची च्या लिंकवर क्लिक करावी. आपले राज्य, जिल्हा उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव ही माहिती भरावी.
यानंतर आपल्याला गेट रिपोर्ट वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला सर्व माहिती मिळेल. ज्या शेतकर्यांना या योजनेचा लाभ सरकारकडून दिला गेला आहे, त्यांचेही नाव राज्य/जिल्हावार/तहसील/गावागप्
जर आपला अर्ज कोणत्याही कागदपत्रासाठी (आधार, मोबाइल नंबर किंवा बँक खाते)थांबलेले आहे तर तो कागद देखील तुम्ही ऑनलाइन अपलोड देखील करु शकता.
जर तुम्ही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घेणार असार तर तुम्ही या वेबसाईल ची मदत घेवून आपला नाव तिथे जोडू शकता.
* या योजनेसाठी असा करा अर्ज –
PM Kisan योजनेसाठी नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना 3 पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
१) या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.
२) CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. मात्र इथं नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारलं जातं.
३) शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. तसंच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com