सातारा : माझ्यापेक्षा लहान मुलांची लग्ने झाली. माझे लग्न का करत नाही, असे म्हणत मुलाने चक्क आपल्या जन्मदात्या आईला कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालत निर्घृण खून केला.
ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याती मोराळे या गावात घडली. वडूज पोलिसांनी मुलगा किरण शहाजी शिंदे (२८) याला ताब्यात घेतले आहे.
बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपी किरण शिंदे याने आपल्या राहत्या घरात माझ्यापेक्षा लहान मुलांची लग्ने झाली आहेत, पण माझे लग्न का करत नाही, असे म्हणत घरातच आपली आई कांताबाई शहाजी शिंदे (५५) यांना शिवीगाळ करत डोक्यात कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालत निर्घृण खून केला.
किरणला अडवण्यास गेल्यावर घराचा दरवाजा तोडून आत आल्यास तुमचा खून करीन, अशी धमकी त्याने वडिलांना दिली. याबाबत आरोपीचे वडील शहाजी बाबूराव शिंदे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.