शरद पवार यांच्या नव्या पक्षाचं ‘हे’ असेल नाव व चिन्ह ! त्याच ताकतीनिशी पुन्हा रणांगणात

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात मोठी उलथापालथ पहायाला मिळाली. शिवसेना व राष्ट्रवादीमधील बंड तसेच शिवसेना हा पक्ष शिंदे यांना देण्यात आला.

आता काल आलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी हा पक्ष व घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे. आगामी निवडणूक तोंडावर असताना हा निकाल आल्याने मोठी उलथापालथ आता पाहायला मिळेल.

शरद पवारांनी स्थापना केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अजित दादांच्या हातात गेला आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजित पवार यांच्या गटाला मान्यता दिलेली आहे.

साधारण वर्षभरापूर्वी आमदारांचा मोठा गट अजित पवारांसोबत सत्तेत गेला परंतु शरद पवार गटाने मात्र विरोधी पक्षात राहणे पसंत केले.

परंतु आता विधिमंडळातील संख्याबळ पाहता निवडणूक आयोगाने या पक्षासह चिन्हावर अजित पवारांचा हक्क सांगितला आहे.

शरद पवार गटाला नवीन नाव व नवीन चिन्ह

आता शरद पवार गटाला नवीन चिन्ह व पक्ष लागेल. निवडणूक आयोगाने त्यांना आज (बुधवार) दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह सुचवायला सांगितलेल असून त्यादृष्टीने तयारी सुरु आहे.

त्यामुळे आता हे नवीन नाव काय असू शकते,चिन्ह काय असू शकते यावर सध्या चर्चा सुरु आहेत. ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ हे नाव आता त्यांच्या नव्या पक्षाच असेल व ‘उगवता सूर्य’ या चिन्हासाठी पवार गट अर्ज करु शकतो अशी माहिती मिळालेली आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ यात मोठ्या साहेबांचे नाव असल्याने फायदा होईल असे गणित यामागे असू शकते.

नव्याने बांधणी सोबत सहानुभूती

आता शरद पवार यांना पुन्हा एकदा नव्याने बांधणी करावी लागणार आहे. महाराष्ट्रभर शरद पवार यांचा मानणारा एक मोठा वर्ग असून त्यात आता नव्याने नेते आणि कार्यकर्त्यांची फळी शरद पवार यांना उभारावी लागणार आहे.

शरद पवारांचा एकंदरीत अनुभव व संबंध पाहता ते हे करू शकतात असा विश्वास सर्वच कार्यकर्त्यांना व नेत्यांना आहे. सोबतच त्यांना जनतेची सहानुभूती मिळेल व त्याचाही फायदा त्यांना होईल असे म्हटले जात आहे.

Ahmednagarlive24 Office