गरजू लाभार्थ्यांना मिळणार हक्काचा निवारा; १ हजार ३३३ घरकुले मंजूर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती-जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागील चार वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली.

तसेच अनेक कामे सुरू आहेत, तर काही कामे पूर्णत्वाकडे जात असून शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचला.

त्याप्रमाणेच गरजू लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी खुल्या वर्गासाठी ११०७, अनुसूचित जाती २३ व जमातीसाठी २०३ असे एकूण १३३३ घरकुल मंजूर झाले आहे.

गरजू लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यासाठी हि घरकुल मंजूर झाल्याची माहिती सभापती पोर्णिमा जगधने यांनी दिली.

घरकुल वाटपाच्या योजनेचे काम सुरू झाले. ग्रामपंचायतीकडून गरजू लाभार्थ्यांची माहिती घेतली जाऊन कागदपत्रांची तपासणी करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांना घरकुल दिले जाणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24