या तालुक्यात कोरोनाचा आकडा दोन हजार पार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. यातच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 45 हजारांच्या पार गेली आहे.

दरम्यान नगर शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असताना जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये देखील कोरोना संक्रमणाचे धक्कादायक आकडे समोर येत आहे.

राहाता तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 2202 वर जाऊन पोहचला आहे. आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला असून 12 हजार 148 जणांचे आतापर्यंत स्वॅब तपासले आहेत.1 हजार 970 रुग्ण बरे होऊन घरी परतले

असून 200 करोना संक्रमीतांवर विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली. दरम्यान एक दिलासादायकबाब म्हणजे तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर पोहचले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24