पुण्यातील रुग्णसंख्या चार हजारांवर;जाणून घ्या अपडेट्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुणे पुण्यात कोरोनाने आपला कहर सुरूच ठेवला आहे. लॉक डाऊन असूनही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यात एकूण रुग्णांची संख्या ४,०१८ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृतांची संख्या २११ पर्यंत पोहोचली आहे.

तसेच शहरातील फक्त ५३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. शहरातील खासगी; तसेच सरकारी रुग्णालयात गेल्या २४ तासांत ९ रुग्णांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

त्यात काल शनिवारी दुपारी चार ते रात्री १०.१५ वाजेपर्यंत तीन जणांचा बळी गेला. त्यात कसबा पेठेतील ७२ वर्षीय पुरुषासह येरवड्यातील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

दोघांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. पद्मावती येथील ६८ वर्षीय पुरुषाचा काल रात्री १०.१५ वाजता मृत्यू झाला. रविवारी पहाटे ५.१५ वाजल्यापासून दुपारी १.१५ वाजेदरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला.

आठ तासांत उर्वरीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. हडपसर, शिवाजीनगर, धनकवडी, गुरुवार पेठ, येरवडा, कोंढव्यातील भाग्योदयनगर येथील व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश आहे.

पुण्यातील कोरोनासंदर्भात रविवारची स्थिती एकूण पॉझिटिव्ह : ४,०१८ बरे झालेले रुग्ण : ५३ ससून रुग्णालयातील रुग्ण : ९ नायडू रुग्णालयातील रुग्ण : १७४ खासगी रुग्णालयातील रुग्ण : १८ गंभीर : १४१ रविवारचे मृत्यू : ९

अहमदनगर लाईव्ह 24