Maharashtra News : आर्थिक दृष्टया दुर्बळ असणाऱ्या परिवारांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका द्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून धान्य दिले जाते.
गरजू-गरजवन्तांच्या लाभ योजनेस पात्र नसलेले मोठे अर्थात सबळ लोक घेत असल्याचे ‘पडताळणीवरून स्पष्ट झाले आहे.
राज्यात हि संख्या एक लाख २६२ असून जिल्ह्यात ४ हजार ९१४ आहे. पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेणार्या या रेशनकार्ड धारकांनी संबंधित तहसील कार्यालयात ‘गिव्ह इट अप’ फॉर्म भरून देत स्वतःहून स्वस्त धान्य योजनेतून बाहेर पडावे, अशी ताकीद जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी शासन निर्देशानुसार दिली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेद्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब अन दुर्बळ वर्गवारीतील ‘परिवारांसाठी शासनामार्फत दरामध्ये तसेच मोफत स्वरूपात धान्याचे वितरण करण्यात येते. ‘कोरोना संकटाच्या काळात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाला मोफत धान्य देण्यास सुरुवात झाली.
अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना २०२८ पर्यंत पाच वर्षासाठी मोफत धान्य देण्यास सुरुवात झाली अंत्योदय योजनेत प्रति शिधापत्रिका प्रत्ती महिना ३५ किलो धान्य व एक किलो साखर दिली जात आहे.
नगर जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकांची संख्या ८७ हजार ९५० आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रत्येक कुटुंबातील सदस्याला दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ वितरित केला जातो.
नगर जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकांची ऐकून संख्या ६ लाख २४ हजार ५३५ आहे. गरिबांना शिधा पुरवणाऱ्या या योजनेचा लाभ जे पात्र नाहीत तेही घेत असल्याचे पडताळणीवरून निदर्शनास आले. शासकीय, निमशासकीय सेवेत पगार आणि निवृत्ती वेतन घेणाऱ्याची नोंद सेवार्थ प्रणालीत असते.
सेवार्थ प्रणालीतील आधार नंबर व शिधापत्रिकांना जोडलेले आधार नंबर एकच असलेले राज्यात एक लाख २६२ आणि नगर जिल्ह्यात ४ हजार ९१४ लोक आढळून
आले.
तालुकानिहाय संख्या
संगमनेर ८८२, अकोले-६५८, पाथर्डी-५०६, राहुरी-३२८, नगर- २९४, पारनेर-२९३, नगर शहर-२७९, श्रीगोंदे-२७८, शेवगाव- २७०, नेवासे-२२६, कर्जत-२१७, राहाता-२१२, जामखेड-१६२, कोपरगाव- १५७, श्रीरामपूर-१५२ अशी तालुकानिहाय संख्या आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ५८९५ रेशनकारधारक असून त्या खालोखाल अहमदनगर ४९१४, पुणे ४४३९. छत्रपती संभाजीनगर- ४४३८, नांदेड ४४२८, अमरावती ४३७६, बीड ४१६९,
नागपूर शहर-३५८९, लातूर ३५२०, खुलडाणा ३१९१, यवतमाळ ३१८७, पुणे शहर-१४९५, सोलापूर शहर ७९९, मुळे २०४८, गोंदिया १३५६, जळगाव ३१२३, कोल्हापुर २८२३, नागपूर २१६१, नंदूरबार १८५१, पालघर १९५५,
परभणी २०५२, रायगड ‘ १९५५, परभणी २०५२, रायगड १६५६,रत्रागिरी ६४०, सांगली २४६९, सिंधूदुर्ग ५३८, वासिम १५९९, अकोला १९२८, भंडारा १५४५, चंद्रपूर १८९४, गडचिरोली २६०१, हिंगोली १७६०, जालना २४३९, नाशिक , धाराशिव २०३०, सातारा २०७९, सोलापूर २२३४,
ठाणे १०००, वर्धा २०५७,परेल- ७६०, अंधेरी ४८१, वडाळा १५१८, ठाणे (शहर) २३२७, कांदिवली ७७८ अशी संख्या आहे. जिल्ह्यातील या रेशनकार्ड धारकांच्या वगळणीसाठी ‘डीएसओ हेमा बडे यांनी पत्राद्वारे सेवा तहसील कार्यालयांना सूचित केले आहे.