अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाची वाढती आकडेवारी व वाढता मृत्युदर पाहता आता नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
दरदिवशी कोरोनाबाधित सापडत असून कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 65 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
या 65 वर्षीय इसमास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास सरळ नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा काल मृत्यू झाला.
तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये काल एकूण 2 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून यात 1 जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
जिल्हा रुग्णालयात 1 तसेच खासगी प्रयोग शाळेत 18 असे सर्व मिळून कालच्या दिवशी 20 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 333 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
तर कोरोनामुळे आतापर्यंत 30 जणांनी आपले प्राण गमावले आहे. गेल्या 24 तासात 24 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर 79 रुग्ण अॅडमिट करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तालुक्यात आतापर्यंत 3133 जणांची अँटीजेन चाचणी करण्यात आली असून यात आतापर्यंत 1333 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved