Flight Emergency Landing : विमानाचे इंजिन आकाशात पडले बंद ! सुमारे अर्धा तास विमान आकाशात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Flight Emergency Landing : शुक्रवारी सकाळी पाटणा विमानतळावर इंडिगो विमानाने उड्डाण करताच त्याचे एक इंजिन बंद पडले, सुमारे अर्धा तास विमान आकाशात होते. या काळात प्रवाशांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला.

अखेर पाटणा विमानतळावर आपत्कालीन लैंडिंग करण्यात यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. विमानात १५ मिनिटे तणाव होता, ब्रेक पूर्णपणे उघडे होते. लैंडिंग सोपे नव्हते, परंतु इंजिनमध्ये अडचण आल्यावरही पायलटने अतिशय हुशारीने उड्डाण हाताळले.

काही प्रवाशांनी सोशल मीडियावर विमानातील दृश्ये टाकून अपघातातून सुखरूप बचावल्याबद्दल आनंद व्यक्त केला. इंजिनमधून जोरात आवाज येत होता. त्यामुळे खूप भीती वाटत होती, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने व्यक्त केली.

इंडिगोचे हे विमान सकाळी ८:४० वाजता पाटण्याहून दिल्लीसाठी उडाले. त्यात १९८१ प्रवासी आणि ९ कर्मचारी होते. उड्डाणानंतर ३ मिनिटांनी इंजिनमध्ये बिघाड झाला. ९:११ वाजता पाटणा विमानतळावर हे विमान सुरक्षित उतरविण्यात आले.