अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :-भाजपच्या वतीने २२ मे रोजी संगमनेरात ‘माझे आंगण, माझे रणांगण’ आंदोलन शांततेच्या मार्गाने व सामाजिक अंतर तसेच शासनाचे नियम पाळून केले.
मात्र, स्थानिक काँग्रेस पक्षाकडून सूडबुद्धीचे राजकारण करण्यात येऊन भाजपच्या आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप भाजप युवा मार्चचे अध्यक्ष अॅड. श्रीराज डेरे यांनी केला.
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून हा आकडा ५० हजारांच्या वर गेला आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने या महामारीचा प्रसार दुप्पट वेगाने पसरू नये,
म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या वतीने संगमनेरात २२ मे रोजी ‘माझे आंगण, माझे रणांगण’ आंदोलन करण्यात आले. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews